ST Bus Income News: यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दु

MSRTC Earnings : ST ला रक्षाबंधनाची भेट; एका दिवशी 39 कोटींची कमाई; 4 दिवसांत 88 लाख महिलांचा प्रवास

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ( MSRTC - एमएसआरटीसी) रक्षाबंधन सणाच्या काळात प्रवाशांच्या वाहतुकीतून 137.37 कोटी रुपये (ST Bus Income) मिळवले. 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत या कालावधीत हे उत्पन्न मिळाले. एका दिवसात अभूतपूर्व 39.09 कोटी रुपये जमा झाले. हे ST चे चालू आर्थिक वर्षातील सर्वाधिक दैनिक उत्पन्न आहे.

रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात एसटी महामंडळाला विक्रमी उत्पन्न मिळते. या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिणी भावाकडे जातात. गेली अनेक वर्षे रक्षाबंधनाच्या सणाच्या कालावधीत एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदाही हा इतिहास कायम राहिला आहे. रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली.

हेही वाचा - Pune Dahihandi Video Viral : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा प्रचंड उत्साह; मात्र, गर्दीच्या पुरामुळे चेंगराचेंगरीची भीती

अधिकाऱ्यांच्या मते, एमएसआरटीसीने 9 ऑगस्ट रोजी 30.06 कोटी रुपये, 10 ऑगस्ट रोजी 34.86 कोटी रुपये आणि 11 ऑगस्ट रोजी 39.09 कोटी रुपये जमा केले. या चार दिवसांत, 88 लाख महिलांसह 1.93 कोटी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.

रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 8 ते 11 ऑगस्ट या चार दिवसांमध्ये सुमारे दोन कोटी प्रवाशांनी एसटी प्रवासाला पसंती दर्शवली. यामुळे एसटी महामंडळाला 137.37 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे परतीचा प्रवास करताना म्हणजे 11 ऑगस्टला एका दिवशी तब्बल 39 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. यावर्षीच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

याबाबत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली. घरी सण असून कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून एसटीला विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

हेही वाचा - Chinchpoklicha Chintamani First Look : 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर