मुंबईतील दहिसरमध्ये एसआरए इमारतीला मोठी आग लागली आ
Mumbai Building Fire: दहिसरमधील एसआरए इमारतीला आग, बचावकार्य सुरु
मुंबई: मुंबईतील दहिसरमध्ये एसआरए इमारतीला मोठी आग लागली आहे. दहिसरमधील शांतीनगर परिसरात आग लागली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत.
दहिसर परिसरात आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्याचे काम सुरु असून आगी नियंत्रणात आणण्यात आग्निशमन दलाल यश मिळाले आहे.
दहिसरमधील एसव्ही रोडवरील शांतीनगर येथील न्यू जनकल्याण सोसायटीमधील 23 मजली निवासी इमारतीच्या 7 व्या मजल्यावर आज दुपारी भीषण आग लागली आहे.