आता नॉन-एसी गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जा

Mumbai Local : मुंबई लोकलचे आधुनिकीकरण! स्वयंचलित दरवाजांसह नॉन-एसी गाड्याही नव्या रूपात

मुंबईकरांच्या प्रवासाला सुरक्षिततेचे नवे कवच मिळणार आहे. उपनगरी रेल्वेत लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असताना, स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम आता वेगाने सुरू झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत मोठी घोषणा करत सांगितले की, नव्या लोकलसोबतच जुन्या गाड्यांनाही ‘ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंग सिस्टीम’ बसवण्यात येणार आहे.

शनिवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोगद्याच्या पाहणीदरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, सुरक्षा हेच प्राधान्य असून प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त एसी लोकलमध्ये उपलब्ध असलेली ही सुविधा आता नॉन-एसी गाड्यांमध्येही लागू होणार आहे.

हेही वाचा - MSRTC Recruitment : एसटी महामंडळात तब्बल 17 हजार जागांसाठी 'बंपर' भरती; सुरुवातीपासूनच पगार.. 

रेल्वे मंत्रालयाने यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. येत्या काळात 238 नव्या एसी लोकल खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 21 हजार कोटी रुपयांचा वंदे मेट्रो प्रकल्प हाती घेतला असून त्याअंतर्गत 2856 एसी कोच मिळणार आहेत. यात स्वयंचलित दरवाजांसोबत गादीयुक्त आसन, चार्जिंग पॉइंट्स, माहितीपट स्क्रीन आणि 130 किमी प्रतितास वेगाने धावण्याची क्षमता यांचा समावेश असेल.

हेही वाचा - Amul Products : मोठी बातमी! अमूल उत्पादनांच्या किंमतीत घट ; बटरपासून 'या' वस्तू होणार स्वस्त 

नॉन-एसी गाड्यांसाठी इंटिग्रल कोच फॅक्टरीला नवीन डिझाईन तयार करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. यात लुव्हर्ड पॅनेल्स आणि छतावरील व्हेंटिलेशन युनिट्समुळे गर्दीच्या वेळेसही हवा खेळती राहील. पहिली आधुनिक नॉन-एसी लोकल नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होणार असून सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर 2026 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. मुंबईकरांसाठी लोकल ही केवळ वाहतूक नाही तर जीवनवाहिनी आहे. दरवाज्यांवर लोंबकळत प्रवास करण्याच्या धोक्यांवर आता पूर्णविराम मिळणार असून, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाची नवी हमी रेल्वेमंत्रालयाने दिली आहे.