उन्हाच्या तडाख्यात एसी लोकल बंद; मुंबईकरांना करावा लागणार नॉन एसीने प्रवास
मुंबई: मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन ही फक्त प्रवासाचं साधन नाही, तर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे अनेक प्रवासी एसी लोकलने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. मात्र, आता या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे.
पश्चिम रेल्वेने काही एसी लोकल तात्पुरत्या स्वरूपात नॉन एसीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 एप्रिल आणि 3 एप्रिल या दोन दिवसांसाठी काही निवडक एसी लोकल आता नॉन एसी सेवेत धावणार आहेत. त्यामुळे या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपले नियोजन योग्य प्रकारे करावे.
या लोकल होणार नॉन एसी
डाऊन मार्गावरील वेळापत्रक: > लोकल क्रमांक: BO95009 • मोड: स्लो • सुटण्याचे स्थानक: चर्चगेट • सुटण्याची वेळ: सकाळी 6.40 • शेवटचे स्थानक: बोरिवली • पोहोचण्याची वेळ: सकाळी 7.45
> लोकल क्रमांक: BO 95021 • मोड: फास्ट • सुटण्याचे स्थानक: चर्चगेट • सुटण्याची वेळ: सकाळी 9.00 • शेवटचे स्थानक: बोरिवली • पोहोचण्याची वेळ: 9.48
> लोकल क्रमांक: VR 95035 • मोड: फास्ट • सुटण्याचे स्थानक: चर्चगेट • सुटण्याची वेळ: दुपारी 12.10 • शेवटचे स्थानक: विरार • पोहोचण्याची वेळ: दुपारी 1.30
> लोकल क्रमांक: VR 95057 • मोड: फास्ट • सुटण्याचे स्थानक: चर्चगेट • सुटण्याची वेळ: दुपारी 3.15 • शेवटचे स्थानक: विरार • पोहोचण्याची वेळ: 4.40
अप मार्गावरील वेळापत्रक: > लोकल क्रमांक: BO 95014 • मोड: फास्ट • सुटण्याचे स्थानक: बोरिवली • सुटण्याची वेळ: सकाळी 8.00 • शेवटचे स्थानक: चर्चगेट • पोहोचण्याची वेळ: 8.55
> लोकल क्रमांक: VR 95048 • मोड: फास्ट • सुटण्याचे स्थानक: विरार • सुटण्याची वेळ: दुपारी 2.00 • शेवटचे स्थानक: चर्चगेट • पोहोचण्याची वेळ: 3.30
> लोकल क्रमांक: BO 95072 • मोड: फास्ट • सुटण्याचे स्थानक: बोरिवली • सुटण्याची वेळ: सायंकाळी 6.15 • शेवटचे स्थानक: चर्चगेट • पोहोचण्याची वेळ: 7.10
रेल्वे प्रशासनाने अद्याप या बदलामागील नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. मात्र, ऐन उन्हाळ्यात अशा निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे एसी लोकलचा पास काढलेल्या प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन आपल्या प्रवासाची आखणी करावी.