मुंबईकरासांठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत वन कार्

आता मुंबईकरांना एकाच कार्डवर प्रवास करता येणार

मुंबई : मुंबईकरासांठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील लोकांचे जीवन हे खूप धावते आहे. सकाळ दिवस कधी उजाडतो आणि रात्र कधी होते हे त्यांचं त्यांनासुद्धा कळतं नाही. कामासाठी रोज मुंबईकर ट्रेन, बस, मेट्रोचा प्रवास करत असतात. अशात त्यांना ट्रेन, मेट्रो, बससाठी वेगवेगळी कार्ड वापरावी लागतात. त्यातसुद्धा त्यांचा वेळ जाते. त्यामुळे मुंबईकरांचा त्रास हलका होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी मोठी घोषणा केली आहे. आता एकाच कार्डवर मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. 

मुंबईत वन कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता एकाच कार्डवर लोकांना प्रवास करता येणार आहे. लोकल, मेट्रो, मोनो, बस, बेस्टला एकच कार्ड वापरता येणार आहे. आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी सर्व प्रकारच्या मान्यता दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील एका महिन्यात यासंदर्भात आम्ही निर्णय घेऊ, त्याचे आर्किटेक्चर पूर्ण होईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

हेही वाचा : ई-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

'30 टक्के अधिक लोकल चालणार'

पायाभूत सुविधा वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरु आहे . अनेक प्रकल्प देखील सुरु आहेत. पायाभूत सुविधा जास्त असेल तर अधिक गाड्या असतील आणि लोकं अधिक प्रवास करु शकतील. अशात 30 टक्के अधिक गाड्या चालणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. आता एका लोकलनंतर तीन मिनिटांनी दुसरी लोकल ट्रेन येते. तो वेळ 180 सेकंदचा असतो. मात्र आता आम्हा दोन गाड्यांमधील कमी करत आहे असे वैष्णव यांनी म्हटले आहे. चांगल्या ट्रेन आणि तंत्रज्ञानात बदल करावे लागतील. ट्रेनचं नवीन डिझाईन देखील बनवावं लागेल आणि त्यासाठी आम्ही काम करत आहे.  238 नव्या ट्रेन तयार केल्या जाणार आहेत. ज्या नव्या डिझाईनचे असतील अशी घोषणा देखील रेल्वेमंत्र्यांनी केली आहे. पुढे बोलताना, यातून आपण 50 टक्के अधिक सर्विस चांगली देऊ शकू. मेट्रो, कोस्टल, आणि लोकल हे मिळून बदल होतील. रेल्वे लाइनवर दीड फूट अधिक पाणी असेल तरीही रेल्वे येत्या काळात चालू शकणार असल्याची महत्त्वपूर्ण बाब रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितली.