Saif Ali Khan Attack Case: सैफवरील हल्ला पूर्वनियोजित होता का?
मुंबई: सैफ अली खानवर गुरूवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूड आणि खंडणी हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सैफच्या घरात घुसलेला आरोपी नेमक्या कोणत्या उद्देश्याने आला होता? या हल्ल्यामागे कोणती टोळी आहे का? सैफ वा त्यांच्या कुटुंबियांशी कोणाचे जुने वैर होते का? अशा अनेक प्रश्नांची उकल शोधण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणांकडून सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा. तपास गुलदस्त्यात? सैफवर हल्ला झाल्यानंतर आरोपी इमारतीतून निघून जाण्याचा व्हिडिओ आधी व्हायरल दुसऱ्या दिवशी आरोपी पाठीला बॅग लावून इमारतीत आरोपी वर जाण्याचा व्हिडिओ व्हायरल पोलिसांना जर नंतरचा व्हिडिओ मिळाला तर तो जातानाचा व्हिडिओ नंतर का मिळाला? सैफला रूग्णालयात कोणी दाखल केले? याबाबत एकवाक्यता नाही हल्ल्यानंतर सैफला रिक्षातून कोणी नेलं? एवढ्या रात्री रिक्षा कोणी आणली? रूग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी अद्याप रिक्षावाल्याचा जबाब घेतलाय का? या हल्ल्याची माहिती पोलिसांनी कोणी दिली? हल्ल्यानंतर आरडाओरडा झाला तर इमारतीखालील सुरक्षारक्षकांना हल्ल्याची वा हल्लेखोराचा थांगपत्ता का नव्हता? अशा अनेक प्रश्नांची उकल तपास यंत्रणांकडून शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान पोलीस आणि गुन्हे शाखा यांच्यात तपासासाठी समन्वय नसल्याचे समोर आलं आहे हल्ल्याचा मुख्य उद्देश्य शोधण्यात अद्याप पोलिसांना यश नाही
पोलिसांनी 32 तासानंतर संशयिताला ताब्यात घेतलं त्याची सैफच्या कुटुंबीयांकडून आरोपीची ओळख पटवली जाणार आहे. हा आरोपी हल्ल्यानंतर कपडे बदलून वांद्रे स्थानकाकडे गेला आणि तेथून तो वसई-विरारच्या दिशेने गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या आधारावर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताला विनाकारण यात गोवले जात असल्याचा आरोप संशयिताच्या कुचुंबियांनी केलाय.सैफच्या प्रकृतीत सुधारणा होत असून पोलिसांना त्याच्या जबाबाची प्रतिक्षा आहे.
सैफबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं ? रक्तबंबाळ अवस्थेत सैफ रुग्णालयात दाखल एखाद्या वाघाप्रमाणे सैफनं हिम्मत दाखवली अवघ्या 2 मिमीनं थोडक्यात सैफचा मणका वाचला चाकू आणखी खोल घुसला असता तर मणक्याला गंभीर दुखापत झाली असती पॅरालिसिस होण्याचा कोणताही धोका नाही मात्र इन्फेक्शनचा धोका असल्यानं सक्त विश्रांतीची गरज सैफच्या तब्येतीत सुधारणा सैफ आता पायावर चालण्यास सुरुवात आयसीयूतून सैफला स्वतंत्र रुममध्ये शिफ्ट केलं पाठीमध्ये पाणी झाल्यानं सैफवर शस्त्रक्रिया गुरुवारी पहाटे सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शुक्रवारी त्याला आयसीयुतून बाहेर आणलं
सैफवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि बॉलिवूड मधील काहींनी याबाबत सरकार आणि प्रशासनाला टिकेची झोड उठवली आहे. सरकारकडून त्या टिकेला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं असून प्रत्येकानं जबाबदारीनं बोलावं, असा दम दादा भुसे यांनी भरला आहे.या हल्लानंतर तपास यंत्रणातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. पोलीस आणि गुन्हे शाखेत हा वाद रंगला आहे.
श्रेयवादाचा वाद तपासाबाबत मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेत समन्वय नसल्याची सुत्रांची माहिती वांद्रे पोलीस तपासाची सर्व माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांचा दावा मध्यरात्री झालेल्या हल्ल्याची बातमी गुन्हे शाखेला तब्बल पाच तासांनी मिळाली गुन्ह्याशी निगडित सीसीटीव्ही फुटेज आणि डिव्हीआर पोलीस ठाण्याच्या ताब्यात मिळालेल्या पुराव्याबाबत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची चर्चा करण्यास टाळाटाळ संबंधितांचे घेतलेले जबाब पोलिसांच्या ताब्यात मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील श्रेयवाद आरोपीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता
सैप अली खानच्या घरी झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि खंडणीच्या धमक्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याआधी बॉलिवूडच्या अनेक कलाकार आणि संबंधितांनी गुन्हेगारी टोळ्यांकडून पैशांसाठी धमक्या आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपीने एक कोटीची मागणी केली होती. त्यानुसार हा हल्ला खंडणीसाठी होता का? याबाबतही तपास सुरू आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही टोळीने घेतलेली नाही.