एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू
मुंबई : गेट वेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. या बोट दुर्घटनेत 77 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नौदलाकडून बचावकार्य सुरू आहे.
निलकमल असे अपघातग्रस्त बोटीचे नाव आहे. एलिफंटाकडे जाणाऱ्या निलकमल बोटीचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत चार ते पाच जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. नौदलाच्या स्पीड बोटीला धडक देऊन ही घटना घडल्याची माहिती आहे. दोन बोटी एकमेकांना धडकल्याने ही घटना झाल्याची माहिती आहे.
नौदलाकडून बचावकार्य सुरू आहे. तसेच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरू आहे. नौदलाच्या 11 बोटी, सागरी पोलिसांच्या 3 बोटी आणि तटरक्षक दलाची एक बोट घटनास्थळी दाखल झाली आहे. बोटींसह चार हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरु आहे. या बोटीची क्षमता फक्त 130 प्रवासी नेण्याची होती. या बोटीतून 80 प्रवासी प्रवास करत होते. नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तातडीने बचावकार्य सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.