Gunratna Sadawarte : 'मैं हूं डॉन', गाण्यावर थिरकले ॲड. गुणरत्न सदावर्ते; Viral Video
मुंबई: ॲड. गुणरत्न सदावर्ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. अशातच, ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यंदा ॲड. सदावर्ते त्यांच्या वक्तव्यामुळे नाही, तर त्यांच्या मुलीमुळे चर्चेत आहेत. ॲड. सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली आहे. लंडनला जाऊन आपली मुलगी बॅरिस्टर होणार आहे, या कारणामुळे ॲड. सदावर्ते यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
मुलीला शुभेच्छा देण्यासाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी कार्यक्रम आयोजित केले. यादरम्यान सदावर्ते यांनी 'मैं हूं डॉन' गाण्यावर थिरकले. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ @shreshthamaha यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ॲड. सदावर्ते यांचं व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.
ॲड. सदावर्ते काय म्हणाले?
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'आपल्या मुलीने वकिलीच्या शिक्षणासाठी ईस्ट लंडन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आहे. या ठिकाणी आपली मुलगी झेन एलएलबी ऑनर्स आणि त्यानंतर बॅरिस्टरची पदवी घेणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे, गुणवत्तेच्या आधारावर झेनने परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे. जेव्हा आपल्या मुलीचं शिक्षण पूर्ण होईल, तेव्हा ती पुन्हा भारतात येईल आणि गरजूंची मदत करेल'.
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुलीला शुभेच्छा देण्यासाठी बुधवारी कार्यक्रमाचे आयोजित केले. यादरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनीही ॲड. सदावर्ते यांच्या मुलीचे कौतुक केले आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते नेहमी चर्चेत असतात. ॲड. सदावर्ते सतत मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर टीका