अजित पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला
१६ सप्टेंबर, २०२४, मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पहाटे लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लालबागचा राजा मंडळाने याप्रसंगी अजित पवारांचा यथोचित सन्मान केला.
सोमवारी सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे उप मानदसचिव प्रविण राणे यांनी शाल व श्रीफळ देऊन अजित पवारांना सन्मानित केले. यावेळी मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेतले यावेळेस सिद्धिविनायक देवस्थानचे अध्यक्ष सदा सरवणकर हे उपस्थित होते. त्यांनी अजित पवार यांना सिद्धिविनायक मंदिराची प्रतिमा देऊन सत्कार केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अजित पवारांचं फडणवीसांनी स्वागत केलं.