1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत दुचाकी, तीन चाकी, च

HSRP नंबर प्लेट बंधनकारक; जाणून घ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे दर

HSRP नंबर प्लेट बंधनकारक; जाणून घ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे दर

राज्यातील जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत दुचाकी, तीन चाकी, चारचाकी आणि जड वाहनांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. यासाठी वाहन मालकांना ठराविक शुल्क भरावे लागणार आहे. परिवहन विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांनी 3 कंपन्यांना दर निश्चित करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी सद्या किती दर निश्चित करण्यात आले आहेत. याचा आढावा पाहुयात. 

वाहनांसाठी HSRP नंबर प्लेटचे दर

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील HSRP प्लेटचे दर साधारणतः समान आहेत. इतर राज्यांमध्येही दर 420 ते 800 रूपयांपर्यंत आहेत. महाराष्ट्रात दुचाकी नंबर प्लेटसाठी 450, तीन चाकीसाठी 500 रूपये, चार चाकी आणि इतर वाहनांसाठी 745 दर ठरवण्यात आले आहेत. पण यात जीएसटीचा समावेश केल्यानंतर किंमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Celebrities Use These Perfumes: शाहरूख खान, रणवीर सिंह वापरतात या ब्रँडचे परफ्यूम 

 

HSRP नंबर प्लेट का आवश्यक?

HSRP प्लेट ही सुरक्षितता आणि बनावट नंबर प्लेट्सना आळा घालण्यासाठी सरकारने लागू केलेली सिस्टम आहे. या प्लेटमध्ये अँल्यूमिनियमची विशेष बनावट, क्रोमियम आधारित होलोग्राम, सातत्यपूर्ण क्रमांक आणि RF टॅग असतो. त्यामुळे वाहनचोरी रोखण्यास मदत होते आणि कायद्याच्या अंमलबजावणीत सहजता येते. 

परिवहन आयुक्तालयाने HSRP बसविण्यासाठी अधिकृत कंपन्यांची निवड केली आहे. वाहनमालकांना त्यांच्या वाहनासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल किंवा अधिकृत विक्रेत्यांकडून नंबर प्लेट बसवून घ्यावी लागेल.

हेही वाचा - Pune Shivshahi Bus Case : आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

 नियम तोडल्यास दंड आकारला जाणार

नवीन मोटार वाहन कायद्यांतर्गत HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आपल्या वाहनावर HSRP बसवलेली नाही, त्यांना वाहतूक विभागाकडून दंड आकारला जाऊ शकतो. काही राज्यांमध्ये अशा वाहनचालकांसाठी विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवणं बंधनकारक असणार आहे.