जपानी लोक केळीचा वापर कपडे बनवण्यासाठी करतात; कसा ते पाहुयात..

जपानी लोक केळीचा वापर कपडे बनवण्यासाठी करतात; कसा ते पाहुयात..

Apeksha Bhandare

Apeksha Bhandare

केळी ही जगभरात प्रसिद्ध आहे. केळीचा इतिहास पाहायला गेला तर प्रथम केळीची शेती पापुआ न्यू गिनीमध्ये केली असावी असे मानले जाते.

आज केळी जगभरातील अनेक उष्णकटिबंधीय भागांत उगवले जाते. केळीचे सुमारे 110 वेगवेगळे प्रकार आहेत.

जेव्हा आपण केळी म्हणतो, तेव्हा ती गोड व मऊ असलेली ‘डेजर्ट केळी’ असते. याशिवाय, ‘प्लॅन्टेन’ नावाचे एक प्रकारची केळी आहे. ज्याचे फळ कडक आणि स्टार्चयुक्त असते. या प्रकारचे केळी स्वयंपाकासाठी व विविध धाग्यांच्या निर्मितीसाठी वापरले जाते.

केळीमध्ये विटामिन बी6, विटामिन सी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळतात. हे घटक शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

केळीतील पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी विशेषतः उपयुक्त ठरते. यामुळे केळीचा नियमित आहारात समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

जगभरातील 107 हून अधिक देशांत केळीची लागवड केली जाते. प्रमुख उत्पादक देशांमध्ये भारत, ब्राझील, चीन, इक्वाडोर, आणि फिलिपाइन्सचा समावेश आहे. याशिवाय, इक्वाडोर, कोस्टारिका, फिलिपाइन्स, कोलंबिया, आणि ग्वाटेमाला हे देश केळीच्या निर्यातीमध्ये आघाडीवर आहेत.

केळीचा खाण्यासाठी वापर होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु केळीच्या झाडातून मिळणारे तंतू वापरून जपानी कपडे आणि घरगुती वस्त्र बनवले जातात.

केळीच्या तंतूपासून उत्तम प्रकारचा कागद तयार केला जातो.


Topics
           

सम्बन्धित सामग्री