Narendra Modi Security : मोदींची हायटेक सुरक्षा, ''या'' 4 बुलेटप्रूफ गाड्यांमधूनच प्रवास
नवी दिल्ली: लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यापूर्वी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सुरक्षा रक्षकांसह कारमधून बाहेर आले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.
यादरम्यान, अनेकांची नजर त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडे गेली, तर काहींची नजर त्यांच्या चकचकीत काळ्या बुलेटप्रूफ कारकडे गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष सुरक्षा Special Protection Group Commandors कडे दिली जाते.
सुरक्षेच्या कारणात्सव पंतप्रधान मोदी मोजक्याच कारमधून प्रवास करतात. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य कारच्या तुलनेत या कारमध्ये अॅडव्हान्स फिचर्स असतात. चला तर जाणून घेऊया पंतप्रधान मोदी कोणत्या कारमधून प्रवास करतात.
BMW 760Li High Security Edition: पंतप्रधान मोदींची BMW 760Li High Security Edition ही पहिली अधिकृत कार होती. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार AK-47 सारख्या उच्च -कॅलिबर असॉल्ट रायफलच्या हल्ल्यांना तोंड देऊ शकते. यासह, हा कार ग्रेनेड हल्ल्यांनाही तोंड देऊ शकतो.
विशेषतः डिझाइन केलेल्या टायर्ससह, कार फ्लॅट किंवा खराब झाल्यास 80 किमी प्रतितास वेगाने चालवता येते. या कारमध्ये 6-लिटर V12 इंजिन आहे जे सुमारे 544bhp आणि 750Nm आउटपुट देते. ते 6.2 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते आणि तिचा टॉप स्पीड 210 किमी प्रतितास आहे.
Range Rover Sentinel: पंतप्रधान मोदींच्या या कारमध्ये अनेक फीर्चस आहेत. टाटा मोटर्सच्या मालकीच्या Range Rover Sentinel कारचे वैशिष्ट्य म्हणजे या कारमध्ये ग्रेनेड, भूसुरुंग आणि Improvised Explosive Device (IED) हल्ल्यांपासून संरक्षण करण्याची क्षमता आहे.
बीएमडब्ल्यू 760 प्रमाणे, कारमध्ये फ्लॅट टायर्सवर 80 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवण्याची आणि सुमारे 50 किमी अंतर कापण्याची क्षमता आहे. ही कार 10.4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावते आणि त्याचा कमाल वेग 193 किमी प्रतितास आहे.
Toyota Land Cruiser: पंतप्रधान मोदींकडे जगातील सर्वात सक्षम एसयूव्हींपैकी एक, टोयोटा लँड क्रूझर देखील आहे. ही भव्य ऑफ-रोडर एक आर्मर्ड वाहन आहे आणि पंतप्रधान 2019 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी लाल किल्ल्यावर आले तेव्हा ती पहिल्यांदा दिसली होती. या कारमध्ये 4.5-लिटर V8 इंजिन आहे जे सुमारे 260 बीएचपी आणि 650 एनएम टॉर्क आउटपुट करते.
मर्सिडीज मेबॅक एस650 गार्ड (Mercedes Maybach S650 Guard): या कारचे वैशिष्ठ म्हणजे आर्मर्ड शेल आणि काचेमुळे, ही कार 15 किलोपर्यंतच्या Trinitrotoluene (TNT) हल्ल्यांना तोंड देऊ शकते. यासह, ही कार इंधन टाकीला सील करते, ज्यामुळे कारला आग लागणार नाही. यासह, ही कार जॅमर, Emergency Oxygen Canister आणि Satellite Phone चा सामना करू शकते.