शाहरुख आणि अक्षयला मागे टाकत ''हा'' अभिनेता ठरला नंबर 1
अरमॅक्स मीडियाने टॉप 10 सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. ही यादी जून 2025 ची आहे. या यादीतून पुन्हा एकदा दाक्षिणात्य अभिनेत्यांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.
नानी: दाक्षिणात्य अभिनेता नानीने बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानला मागे टाकून दहाव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
अक्षय कुमार: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार नवव्या क्रमांकावर आहे.
रामचरण तेजा: टॉप 10 सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेत्यांची यादीत दाक्षिणात्य अभिनेता आठव्या क्रमांकावर आहे.
ज्युनिअर एनटीआर: दाक्षिणात्य अभिनेता जुनिअर एनटीआर सातव्या क्रमांकावर आहे.
महेश बाबू: दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू सहाव्या क्रमांकावर आहे.
अजित कुमार: जूनच्या टॉप 10 अभिनेत्यांच्या यादीत अजित कुमारने पाचवे स्थान पटकावले आहे.
शाहरुख खान: बॉलीवूडचा किंगखान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान चौथ्या क्रमांकावर आहे.
अल्लू अर्जुन: ''पुष्पा 2'' फेम दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने शाहरुख खानला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे.
थलापती विजय: या यादीत दाक्षिणात्य अभिनेता थलापती विजय दुसऱ्या क्रमांकावर आहे.
प्रभास: ऑरमॅक्स मीडियाच्या अहवालात, पुन्हा एकदा बाहुबली फेम साऊथ सुपरस्टार म्हणजेच प्रभासने पहिले स्थान पटकावले आहे.