तारक मेहता का उल्टा चष्मा फेम 'माधवी भिडे'चा बोल्ड अंदाज पाहता चाहते हैराण

गेल्या 17 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका यशस्वीरीत्या चालत आहे. या मालिकेतील अनेक पात्र सतत चर्चेत असतात.

Ishwari Kuge

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम ''माधवी भिडे''चा बोल्ड अंदाज पाहता चाहते हैराण

मुंबई: गेल्या 17 वर्षांपासून ''तारक मेहता का उल्टा चष्मा'' ही मालिका यशस्वीरीत्या चालत आहे. या मालिकेतील अनेक पात्र सतत चर्चेत असतात.

त्यापैकीच एक म्हणजे ''माधवी भिडे''ची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री सोनालिका जोशी.

''तारक मेहता का उल्टा चष्मा'' मालिकेत साध्या, सोज्वळ अंदाजात दिसणाऱ्या या अभिनेत्रीने बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

नुकताच, सोनालिका जोशीने केलेल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

सोनालिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही जुने फोटोशूट शेअर केले आहे, ज्यामध्ये ते काळ्या रंगाच्या घागरा-चोलीमध्ये दिसत आहे.

सोनालिकाच्या या ग्लॅमरस लुकमध्ये तिने मोठी लाल बिंदी, जंक ज्वेलरी, कमरबंद आणि नोजरिंग परिधान केली आहे.

त्यासोबतच, सोनालिकाची ओपन हेअरस्टाईल आणि स्मोकी आय मेकअपमुळे ती आणखी आकर्षक दिसते.

या फोटोशूटमधील सोनालिकाच्या बोल्ड पोझमुळे चाहत्यांनी तिच्या सोशल मीडियावर लाईक्स, शेअर आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


Topics
                                   

सम्बन्धित सामग्री