महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रॅंड ॲम्बेसिडर म्हणून 'या' कलाकारांची निवड

गायक शंकर महादेवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृहावर या कलाकारांचा सत्कार केला.

Ishwari Kuge

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून ''या'' कलाकारांची निवड

गायक शंकर महादेवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृहावर या कलाकारांचा सत्कार केला.

या सत्कारादरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. या निवडीबद्दल तिथे उपस्थित असलेल्या मंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 या कायद्यामुळे नागरिकांना सरकारी सेवा वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्याचा अधिकार दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य काम म्हणजे या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत आहे का, हे सुनिश्चित करणे.

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत आणि शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संमत करण्यात आला आहे.


Topics
                 

सम्बन्धित सामग्री