मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भगिनी जैजयवंती यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत.
लग्न सोहळ्यानिमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आले आहे.
दादरमधील राजा शिवाजी महाराज विद्यालय येथे पार पडणाऱ्या सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि वहिनी रश्मी ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे.
मागील वर्षी 22 डिसेंबर रोजी राज ठाकरे यांच्या भगिनी जैजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते.
यापूर्वी देखील अनेक कौटुंबिक सोहळ्यात ठाकरे कुटुंब एकत्र आले होते.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय चर्चांणा उधाण आले आहे.