''या'' कारणामुळे ट्रेन पटरीवरून धावताना ठक ठक असा आवाज येतो
ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा तुम्ही ''ठक ठक'' असा आवाज नक्कीच ऐकलं असाल. हा आवाज नेमकं कोणत्या कारणामुळे निर्माण होतो असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
1. रेल्वे रुळांचे सांधे (Joints) – रेल्वेचे रुळ लांब तुकड्यांमध्ये असतात आणि त्यांना जोडण्यासाठी थोडी जागा ठेवली जाते. जेव्हा ट्रेन त्या सांध्यांवरून जाते, तेव्हा चाक ठक ठक असा आवाज निर्माण करते.
2. नवीन वेल्डेड रेल्वे ट्रॅक – सध्याच्या नवीन रेल्वेमध्ये ''रेल्वे रुळांचे सांधे (Joints)'' कमी कारण्यासाठी वेल्डेड ट्रॅक वापरतात. यामुळे, आवाज कमी होतो. पण तरीदेखील चाकांमुळे आणि कंपनांमुळे काही प्रमाणात आवाज निर्माण होतो.
3. चाकांची रचना – ट्रेनची चाके ही सरळ नसून थोडीशी कोनीय (शंकूसारखी) असते. त्यामुळे ट्रेनची चाके योग्यरीत्या फिरते. यामुळेदेखील कंपन होऊन आवाज निर्माण होतो.
4. ट्रेनचा वेग – जर ट्रेन वेगवान असेल तर मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण होतो. मात्र, जर ट्रेन हळू चालत असेल तर हा आवाज कमी प्रमाणात ऐकू येतो.
5. स्प्रिंग आणि कंपन यंत्रणा – ट्रेनच्या बोगीमध्ये स्प्रिंग आणि डॅम्पर असतात, जे धक्के कमी करण्यात मदत करते. मात्र, तरीदेखील हा आवाज निर्माण होतो. ज्यामुळे ठक ठक असा आवाज निर्माण होतो.
6. रुळांची स्थिती – जर रेल्वे ट्रॅक जुना असेल किंवा व्यवस्थित नसेल, आणि अशा परिस्थितीत जर ट्रेन पटरीवरून धावते तेव्हा आवाज आणि कंपन जास्त प्रमाणात निर्माण होतो. ज्यामुळे ठक ठक असा आवाज ऐकू येतो.