गिरगाव चौपाटीवर नौकाविहारचा थरार

गिरगाव चौपाटीवर नौकाविहारचा थरार; 2026 च्या आशियाई स्पर्धेची तयारी सुरू

Ayush Yashwant Shetye

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सध्या नौकाविहाराचा थरारक अनुभव सुरू असून ‘सेल इंडिया 2025 सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप’चे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षक संदीप जैन यांनी सांगितले की, गिरगावच्या समुद्रातील हवामान व वातावरण एशियन गेम्ससाठी उत्तम आहे.

‘सेल इंडिया 2025’ या स्पर्धेत 7 आंतरराष्ट्रीय श्रेणीतील खेळांचा समावेश असून, देशभरातील नामांकित खलाशी यात सहभागी झाले आहेत. वर्ल्ड सेलिंगच्या पात्र आंतरराष्ट्रीय न्यायाधीशांच्या देखरेखीखाली ही स्पर्धा होत आहे.

गिरगाव चौपाटीवर सुरू असलेली ही स्पर्धा नौकानयन क्रीडेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आगामी आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी मजबूत करण्यासाठी एक मोठं पाऊल ठरत आहे.


Topics
                                   

सम्बन्धित सामग्री