संजय शिरसाट यांच्या हातात सिगारेट, बाजूला पैशांची

50 खोके एकदम ओके, त्यातील एक खोका दिसला; शिरसाटांच्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंची टीका

मुंबई: संजय शिरसाट यांच्या हातात सिगारेट, बाजूला पैशांची बॅग आणि त्यांचा पाळीव श्वान असलेला व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळाला. हा व्हिडीओ संजय राऊत यांनीही शेअर केला आहे. या व्हिडीओनंतर राऊत यांनी गंभीर आरोपही केले. यातच आता 50 खोके एकदम ओके, त्यातील एक खोका दिसला अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

'50 खोके एकदम ओके, त्यातील एक खोका दिसला'  भ्रष्टनाथ म्हणत आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. आता 50 खोके एकदम ओके, त्यातील एक खोका दिसला. शिरसाटांच्या व्हायरल व्हिडीओची चौकशी करा अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली असताना त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मंत्री शिरसाट एका हॉटेलातील रुममध्ये हातात सिगारेट घेऊन बसले आहेत. तसेच त्यांच्या बाजूला पैशांची बॅग असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर राऊतांना पैशांशिवाय काहीच दिसत नाही. व्हिडिओमध्ये दिसणारं माझं बेडरुम आहे. कपडे ठेवायच्या बॅगेत पैसे कोण ठेवतं? असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: श्रावणात महिला हिरवे कपडे आणि बांगड्या का घालतात?, जाणून घ्या...

'शिरसाटांना आयटीची नोटीस तरी ऐटीत फिरतायत' मुख्यमंत्री कारवाई करतील अशी आशा आहे. राजीनाम्याची मागणी कशासाठी, मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. शिरसाटांना आयटीची नोटीस तरी ऐटीत फिरतायत. व्हिडीओ काढला तेव्हा शिरसाट कोणत्या नशेत होते असे  शिरसाटांच्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काय म्हणाले शिरसाट?  राऊतांना पैशांशिवाय काहीच दिसत नाही. व्हिडिओमध्ये दिसणारं माझं बेडरुम आहे. कपडे ठेवायच्या बॅगेत पैसे कोण ठेवतं? असा सवाल शिरसाट यांनी केला आहे. इतके पैसे असते तर आल्या आल्या कपाटात टाकले असते. संजय राऊत याने आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलं असे शिरसाट यांनी म्हटले आहे. अमित शाह याला भेटले. याला संताजी धनाजी दिसतात का असे स्टेटमेंट फक्त संजय राऊतला जमेल असेही त्यांनी म्हटले आहे.