Maratha Morcha Azad Maidan: सोलापुरातून मराठा आंदोलकाने आणला रेडा; जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर जाणार
मुंबई: मनोज जरांगेंचा ताफा शुक्रवारी आझाद मैदानावर दाखल झाला आहे. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातून मराठा आंदोलकाने रेडा आणला आहे. शुक्रवारी आझाद मैदानावरील उपोषणाला सुरुवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक या ठिकाणी उपस्थित होता. अशा परिस्थितीत रेड्याला आझाद मैदानात घेऊन जाणं शक्य झालं नाही मात्र रेड्याला आझाद मैदानात घेऊन जाणार आहेत. हेही वाचा: Maratha Reservation Meeting: मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू, काय तोडगा निघणार?
वाहतूक कोंडीमुळे शुक्रवारी रेड्याला आझाद मैदानात घेऊन जाणं शक्य झालं नाही. मात्र आज मराठा आंदोलक रेड्याला घेऊन आझाद मैदानात जाणार आहे. सिडको एक्जीबिशन येथे रेड्याला ठेवण्यात आले असून रेड्याला घेऊन जाणार मुंबईला जाणार असल्याचे मराठा आंदोलकाने म्हटले आहे. आमच्या भावना कळत नसतील तर या पशुच्या भावना समजून आरक्षण द्यावं अशी मागणी या आंदोलकाने केली आहे.