कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खे

अजित पवारांनी कान उपटले; पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे कुणावर बरसणार ?

मुंबई: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळताना व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला. यानंतर  व्हिडिओवर राज्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले. त्यानंतर तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा पाहायला मिळाला. या रमीच्या डावात सुरज चव्हाण यांचा गेम झाला. या संपूर्ण प्रकारानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. वातावरण शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर कोकाटेंवर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि इतरांनी मारहाण केली. त्यानंतर राज्यात संताप उसळला आणि सुरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला.  

हेही वाचा: त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला चपराक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने माणिकराव कोकाटेंना फोन करुन चर्चा केली. या पार्श्वभूमीवर आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे माध्यमांशी चर्चा करणार आहेत. 

कोकाटे काय स्पष्टीकरण देतील?  मंगळवारी सकाळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सिन्नर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत काही निर्णय जाहीर करतात की आपल्यावरील आरोपाच्या अनुषंगाने पुन्हा स्पष्टीकरण देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळत असताना व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली गेली. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनीही कोकाटेंना फोन करुन चर्चा केली. पवारांनी कोकाटेंचे कान उपटले. हा व्हिडीओ कुणी काढला? म्हणून कोकाटेंची चिडचिड होत आहे. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे कोकाटे कुणार बरसणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.