उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी या गद्दारांसमोर उभा आह

उद्धव ठाकरेंच्या 'कम ऑन किल मी' वक्तव्यावर अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

मुंबई: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी या गद्दारांसमोर उभा आहे. कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर'. यावर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

'कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर',असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या, 'आपला शांतताप्रिय देश आहे आणि शांतताप्रिय पक्ष सत्तेत आहे. तर आपल्याला कुणी मारेल असा विचार करण्याची गरज नाही'.

हेही वाचा: हिंदुत्वाच्या मुद्द्याखाली ठाकरे बंधूंची युती होणार?

'मरे हुए को क्या मारना?' - एकनाथ शिंदे:

शिवसेनेच्या 59व्या वर्धापनदिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका करत म्हणाले, 'मी या गद्दारांसमोर उभा आहे. कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर'. उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे म्हणाले, 'मरे हुए को क्या मारना?'.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले. त्यांनी हिंदुत्त्व बाजूला सोडून दिलं. महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली. मतदारांना धोका दिला. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी अगतिक, लाचार झाले', असे एकनाथ शिंदे म्हणाले.