Bhandara Guardian Minister Change: भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदी पंकज भोयरांची वर्णी; भंडाऱ्याचे पालकमंत्री का बदलले?, चर्चांणा उधाण
भंडारा: भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बदलण्यात आले आहे. राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यावर भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे होते. आता त्या जागी भोयर यांची वर्णी लागली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. यातच आता भंडाऱ्याचे पालकमंत्री का बदलले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नुकतच भंडाऱ्याचे पालकमंत्रीपद पंकज भोयर यांना देण्यात आले. त्यामुळे आता भंडारा जिल्ह्याची जबाबदारी पंकज भोयर सांभाळणार आहेत. यापूर्वी भंडाऱ्याचे पालकमंत्री संजय सावकारे होते. मात्र पालकमंत्रीपद त्यांच्याकडून काढण्यात आले. यानंतर अनेक चर्चा होत आहेत. नेमकं त्याचं पालकमंत्रीपद का बदलण्यात आलं असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भंडाऱ्याचे पालकमंत्री का बदलले? संजय सावकारे पालकमंत्री म्हणून पूर्णकाळ जिल्ह्यात उपलब्ध नसायचे. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ते भंडाऱ्यात येत होते. भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतरही सावकारेंची जिल्ह्यात अनुपस्थिती होती. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सावकारेंविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला. जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली. तसेच शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्ह्यातील वाढती ताकद भाजपाने लक्षात घेतली. यामुळे आगामी पालिका निवडणुकीत भाजपाच्या ताकद वाढीसाठी भोयर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर भोयर यांच्याकडून फडणवीसांचे आभार
गेल्या आठ महिन्यातील काम बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. निश्चितपणे, फडणवीसांनी विश्वास दाखवला. त्यामुळे वर्धा जिल्ह्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यातही करु असे पंकज भोयर यांनी म्हटले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलेल्या योजनांची अंमलबजावणी सर्वसामान्यपर्यंत करण्याचा प्रयत्न करु. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही. ऑनलाईन अर्ज करुनही त्यांना योजनेपासून वंचित रहावे लागले. याबद्दल बोलताना,धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा निर्णय घेऊ असे नवनिर्वाचित पालकमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले आहे.