उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान

'उद्धव ठाकरेंनी चष्म्याचा नंबर बदलावा'; बावनकुळे आक्रमक

मुंबई: उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी सकाळी दिल्ली येथील खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी  पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर घणाघात टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'मोदी सतत परदेश दौरा करत असतात. मात्र, आपल्या देशाचा जगात एकही मित्र नाही'. यावर, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले 'उद्धव ठाकरेंनी चष्म्याचा नंबर बदलावा'.

हेही वाचा: Raksha Bandhan Special: कशी असावी राखी? शुभ मुहुर्त आणि योग्य पद्धत जाणून घ्या

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

'उद्धव ठाकरेंना दिसत नाही, त्यांना चष्म्याचा नंबर बदलावा लागेल किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागेल. मोदींनी योगा दिवस दिला. देशासह जगाने तो स्वीकारला. यासह, जेव्हा मोदींनी दहशतवादांच्या विरोधात लढा उभारला, तेव्हा दहशतवादांविरोधात जग उभे राहिले. मोदींजीच्या पाठीशी संपूर्ण जग आहे, हे उद्धव ठाकरेंना दिसत नाही? जगाची आणि मोदींची तुलना करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष सांभाळावा. आपल्या पक्षातील लोक दररोज शिंदे यांच्या पक्षात चालले आहेत, हे उद्धव ठाकरेंना दिसत नाही? त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलावा लागेल', बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा: मृणालला धनुषच्या बहिणींचीही साथ? अखेर अफेअरच्या चर्चेमध्ये झाला मोठा खुलासा

'ऑपरेशन सिंधूरनंतर पण मोदी...' - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, 'आपल्या देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांची गरज आहे. आत्ताचे पंतप्रधान हे भाजपचे आहेत. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतरही मोदी बिहारला गेले, मात्र पहलगामला गेले नाही. या सरकारकडे परराष्ट्र नीती वगैरे काही नाही, परराष्ट्र धोरणात सरकार अपयश ठरलं असून खंबीर धोरण नाही. अमेरिका डोळे वटारत असताना डोवाल रशियाला गेले. पंतप्रधान चीनला चालले आहेत. चीन बरोबर संबंधही त्यांच्या मित्रासाठी दरवाजे उघडतात का? पाहत असावेत'.

'डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या ट्रम्प टॅरिफचा फटका सामान्यांना बसणार असून ट्रम्प आपल्या देशाची खिल्ली उडवत आहेत. आपण त्यांना अवाक्षरानेही उत्तर देत नाही. देशाचं सरकार नेमकं चालवतंय कोण? असे देखील त्यांनी म्हटले. ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी किंमत मोजण्यासाठी तयार असल्याच्या मोदींच्या वक्तव्याचा सुद्धा समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकणाऱ्या मोदींना आताच शेतकऱ्यांचा पुळका का आला? यांचा बुरखा दररोज फाटत आहे', असा हल्लबोल उद्धव ठाकरेंनी केला.