मस्साजोग हत्याकांड प्रकरण: धनंजय मुंडेंच्या राजीना

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा? राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार? करुणा मुंडे-शर्मांच्या पोस्टने चर्चांना उधाण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. विरोधकांसह महायुतीतील काही आमदार देखील मुंडे यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांच्यावर आरोप केले जात आहेत.

आता पोलिसांच्या आरोपपत्रानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर करुणा मुंडे-शर्मा यांनी फेसबुक पोस्ट करत सूचक वक्तव्य केले आहे. "उद्या म्हणजेच तीन मार्च रोजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार" असे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

कालच पोलिसांच्या आरोपपत्रात वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आणि दबाव अधिकच वाढला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होत आहे, त्यामुळे मुंडेंच्या संभाव्य राजीनाम्याचा या पार्श्वभूमीशी काही संबंध आहे का, हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

राजकीय तज्ज्ञांच्या मते, मुंडेंवर वाढणाऱ्या दबावामुळे त्यांच्या भविष्यासंदर्भात मोठे राजकीय समीकरण बदलू शकते. आता या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेते आणि धनंजय मुंडे स्वतः काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.