रविवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनी

वैर माझ्याशी होतं तर माझ्या मातीची बदनामी का? धनंजय मुंडेंचं विरोधकांना प्रत्यूत्तर

बीड: राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत आहेत. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. रविवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीड येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी विरोधकांना प्रयुत्तर दिले. 'तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता', अशी शेरोशायरी करून धनंजय मुंडे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. 

काय म्हणाले धनंजय मुंडे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, 'मी तटकरे साहेबांना विनंती केली होती की, आज मला भाषण नाही करायचं. याचं कारण मी खरंतर कुणाला सांगितलं नाही, पण कदाचित तुम्हा सर्वांना सांगावे लागेल. इथं बोलावं की मैदानात बोलावं? हा प्रश्न माझ्या मनात होता. म्हणून आज आपल्या सर्वांचे क्षमा मागतो. आपल्याला माहित आहे की आपण येथे कोणत्या कामासाठी आलो आहोत. आपल्या संघटनेच्या माध्यमातून बीडचा आगळावेगळा इतिहास आपण महाराष्ट्राला दाखवावा याच उद्देशाने याठिकाणी आज आपण सर्वजण आला आहात. आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्ह्याबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करू. असं वाचन आपण तटकरे साहेबांना देऊ'. 

पुढे, धनंजय मुंडे म्हणाले की, 'मी बऱ्याच दिवसांनी बोलत आहे. माझी न बोलण्याची डबल सेंच्युरी झाली आहे. मी न बोलता 200 दिवस काढले. या दोनशे दिवसांत ज्या काही गोष्टी घडल्या, त्यापैकी एक गोष्ट मला खूप मनाला लागलं. ते म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी बीड जिल्ह्याची बदनामी केली, भलेही तो बीडच्या मातीतला असेल किंवा बाहेरचा असेल. त्यांना एवढंच सांगायचं वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? त्यांना एवढं सांगणं आहे'. 

हेही वाचा: ठाकरे ब्रँड बाजारात चालत नाही; मुनगंटीवारांचा ठाकरे बंधूंना टोला

'जुबान काट लो लहजा बदल नही सकता' - धनंजय मुंडे

'ज्यांनी बाहेरून येऊन या दरम्यान एका घटनेचा, एका व्यक्तीचा, एका जिल्हााचा, एका मातीचा, एका मतदारसंघाचा वापर करून या जिल्ह्याची बदनामी केली. त्यांच्या प्रति मी चार ओळी म्हणणार आहे. 'तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नही सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता', अशी शेरोशायरी करत धनंजय मुंडेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.