महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्त

फडणवीस सरकारमध्ये घराणेशाहीचा दबदबा

मुंबई : महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सायंकाळी नागपुरात पार पडला. नागपूरमधील राजभवनाच्या हिरळीवर राज्यपालांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. फडणवीस सरकारच्या या जम्बो मंत्रिमंडळात राजकीय वारशांना सर्वाधिक संधी मिळाल्याचे दिसून आले. या मंत्रिमंडळात मुंडे भाऊ-बहिण यांचा समावेश असून अनेत नेत्यांच्या मुलांना मंत्रिपदाची वर्णी लागली आहे.

 

वडिलांच्या कामाचा मुलांच्या मंत्रिपदाला फायदा

 

पंकजा मु़ंडे- धनंजय मुंडे - चुलत भाऊ-बहिण

गोपीनाथ मुंडे यांची पंकजा मोठी मुलगी

नितेश राणे - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपत्र

इंद्रनील नाईक- माजी मुख्यमत्री वसंतराव नाईकांचे नातू

आदिती तटकरे - माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या  कन्या

आकाश फुंडकर - माजी मंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांचे सुपुत्र

योगेश कदम - माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र

शंभूराज देसाई - माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे ते नातू

शिवेंद्रसिंहराजे भोसले - माजी खासदार अभयसिंहराजे भोसले यांचे सुपुत्र

अतुल सावे - माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे सुपुत्र

मेघना बोर्डीकर - ज्येष्ठ राजकारणी रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या

जयकुमार रावल - माजी आमदार दादासाहेब रावल यांचे नातू

मकरंद जाधव-पाटील - माजी खासदार  लक्ष्मणराव जाधव-पाटील यांचे सुपुत्र