फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र सर्वांचं स्वागत करतो,
Devendra Fadnavis : दुबेच नाही कुणीही आलं तरी संरक्षण; पण मराठीचा अपमान केला तर...
सध्या राज्यात मराठी-अमराठी वाद पेटून उठला आहे. विरोधक आणि काही सामाजिक संघटनांनी हे प्रकरण चांगलंच गाजवलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, 'आम्ही निशिकांत दुबेंचं स्वागत करतो.' विरोधकांनी या मुद्द्यावर टीकेची झोड उठवली असली, तरी आता सत्ता बाजूकडूनही एक स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे. फडणवीस म्हणाले की, दुबे असो किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात प्रत्येकाचं स्वागत केलं जातं. महाराष्ट्र अतिथीदेवो भव ही संस्कृती जपणारा आहे. इथे येणाऱ्यांना आपण नेहमीच आदराने पाहतो. मात्र, कोणी जर मराठी भाषा, संस्कृती किंवा अस्मितेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, तर तो खपवून घेतला जाणार नाही, असंही त्यांनी ठामपणे नमूद केलं.