बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्

बीड हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात

बीड : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनी पुण्यातून अटक केली आहे. पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पुण्यात ३१ डिसेंबर रोजी वाल्मिक कराड याने पोलिसांना सरेंडर केलं आहे. 

सरपंच हत्या प्रकरणी सीआयडी तपास सुरू आहे. या प्रकरणी पुणे येथे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले आणि सीआयडी दीड तास कसून चौकशी करण्यात आली. तसेच नेकनूर ग्रामीण रुग्णालयात या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे काही दिवस भिवंडीमध्ये वास्तव्यास होते. भिवंडीनंतर दोघे पुण्यात आल्याचं समोर आले. त्यानंतर सीआयडीने त्यांना पुण्यातून अटक केली. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

पुण्यातून ताब्यात घेतलेला सुदर्शन घुले कोण? 

सुदर्शन घुले हा २७ वर्षाचा आहे. तो बीडमधील केजच्या टाकळी गावचा रहिवाशी आहे. सुदर्शनचे शिक्षण इयत्ता सातवीपर्यंत झाले आहे.  सुदर्शन हा ऊसतोड मुकादम आहे. तो उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून वसुली करायचा. त्याची राजकारणात चांगली ओळख आहे. सुदर्शनने १० वर्षात १० गुन्हे केल आहेत. दरम्यान त्याची विष्णू चाटेसोबत ओळख झाली. चाटे हा वाल्मिक कराडचा खास माणूस आहे. त्यातून सुदर्शनला कामं मिळाली.   

हेही वाचा : भुजबळ कमळ हाती घेणार?  

'पकडलेले आरोपी प्यादे, मुख्य आरोपी आका...' 

बीडच्या हत्या प्रकरणात आमदार धस यांनी सतत आवाज उठवलेला आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक केल्यानंतर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली. पुण्यातून पकडलेले आरोपी हे प्यादे आहेत. मुख्य आरोपी आका आहे. आज दोन आरोपींना अटक केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये चालू असलेल्या चौकशीमध्ये आपण समाधानी असल्याचे आमदार  सुरेश धस म्हणाले आहेत. त्याचबरोबर देशमुख प्रकरणात सीआयडीने केलेल्या कामगिरीबद्दल सीआयडीचे आभार त्यांनी मानले आहेत.