एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश
अन्वर शेख. प्रतिनिधी. चंद्रपूर: वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना आता अधिक ताकदीने उदयास येताना दिसत आहे. लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या प्रयत्नातून आणि नेतृत्वाखाली मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे वरोरा-भद्रावतीतील राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळण्याची शक्यता असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळात मोठी भर पडली आहे.
हेही वाचा: फडणवीसांनंतर शिंदेंच्या राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या हालचाली
या भव्य प्रवेश सोहळ्यात वरोरा आणि भद्रावती नगर परिषदांतील माजी नगरसेवक, विविध ग्रामपंचायतीतील सरपंच-उपसरपंच, सदस्य, बाजार समितीचे माजी संचालक, महिला आणि युवक शिवसैनिक अशा शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे.