'जर राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर आम्ही त्यांच्या

राहुल गांधी नाशकात आल्यास तोंडाला काळं फासू; शिवसेना उबाठा नेते बाळा दराडेंचा इशारा

नाशिक: महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येताच, ठाकरे गटाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना थेट इशारा दिला आहे. 'जर राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर आम्ही त्यांच्या तोंडावर काळा दोरा बांधू आणि त्यांच्या गाडीवर दगडफेक करू', असा कडक इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी दिला आहे.

हेही वाचा: देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा अपघात; कारमधील 8 जण गंभीर जखमी

सावरकरांबद्दलचे विधान आम्ही कधीही सहन करणार नाही - दराडे:

काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, 'राहुल गांधींचे सावरकरांबद्दलचे विधान आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्यासाठी सावरकर आणि हिंदुत्व प्रथम येते. महाविकास आघाडी खड्ड्यात गेली आहे, आता आमच्यासाठी फक्त सावरकर आणि हिंदुत्व महत्त्वाचे आहे'. 

अलिकडेच, राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाने वारंवार सावरकरांचा सन्मान राखण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे, बाळा दराडे यांच्या इशाऱ्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे आणि काँग्रेस-ठाकरे गटात तणाव निर्माण झाला आहे.

हेही वाचा: डिनो मोरयाची चौकशी करा... आदित्य ठाकरेंचं पितळ उघडं पडेल; मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा

या घडामोडींमुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापले आहे. जर राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर येण्याचा निर्णय घेतात, तर ठाकरे गटाकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील या वादाचा आगामी निवडणुकीत काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.