मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर राज्य सरकार घेणार का 'हा' मोठा निर्णय?

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहे. यासह, मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. यासह, मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानात उपस्थित आहेत. यादरम्यान, मनोज जरांगे म्हणाले की, 'जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही'. 

यावेळी, मनोज जरांगेंनी असेही सांगितले की, 'सरकारने आता चर्चेसाठी यावे'. त्यानंतर, आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटेल असा अंदाज वर्तवला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारचे प्रतिनिधी आज सांयकाळी आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेतील आणि चर्चा करतील. 

मनोज जरांगेंनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. यासह, मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानात उपस्थित आहेत. एकीकडे गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईत लाखो भाविक दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे, मनोज जरांगेंच्या उपोषणावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. तसेच, आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासह, राज्य सरकारच्या या शिष्टमंडळात कोण कोण असतील, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

हेही वाचा: Sanjay Raut: जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जातंय; राऊतांचा महायुतीला टोला

शरद पवार गटाचा फडणवीस सरकारला टोला

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, 'आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल', रोहित पवार म्हणाले. 

पुढे, रोहित पवार म्हणाले की, 'मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!'.