रांगेंच्या या आंदोलनावर महाराष्ट्रातील अनेक नेत्या

Raj Thackeray on Maratha morcha azad maidan : 'याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा...', राज ठाकरे यांची मराठा आरक्षणप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

मनोज जरांगेंचा ताफा शुक्रवारी आझाद मैदानावर दाखल झाला आहे. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.  शुक्रवारी आझाद मैदानावरील उपोषणाला सुरुवात झाली.जरांगेंच्या या आंदोलनावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांनी राज ठाकरेंना मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, " मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील". 

हेही वाचा - Maratha Reservation Meeting: मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू, काय तोडगा निघणार? 

पुढे ते म्हणाले की,  "आता मनोज जरांगे परत का आले? याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा.  एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना तरीही हे परत का आले ? असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना यांच्यावर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा - Maratha Morcha Azad Maidan: सोलापुरातून मराठा आंदोलकाने आणला रेडा; जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर जाणार 

दरम्याने या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु आहे. कुणबी नोंदींच्या पडताळणीसाठी समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात बैठकीत चर्चा होत आहे. यावर काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.