Manikrao Kokate: माझी नाहक बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचणार; कोकाटेंनी दिला इशारा
नाशिक: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर कोकाटेंवर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याच पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मला रमी खेळता येत नाही. माझी नाहक बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचणार असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे.
'माझी नाहक बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचणार' कृषीमंत्री माणिरराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मला रमी खेळता येत नाही. मोबाईलमध्ये गेम खेळणं हा खूप छोटा विषय आहे. ऑनलाईन रमी खेळण्याकरता अकाऊंट लागतं. जाहिरात स्किप करताना कुणीतरी व्हिडिओ काढला. त्यामुळे माझी नाहक बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचणार असल्याचे कोकाटे यांनी म्हटले आहे.
'दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देणार' कोकाटेंचा रमी खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर राजीनामाही देईन असे कोकाटेंनी सांगितले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी वरिष्ठांना पत्र देणार आहे. तसेच राजीनामा देण्यासारखं घडलंय काय ? असा सवाल कोकाटेंनी उपस्थित केला. दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देणार असा इशारा कृषीमंत्र्यांनी दिला.
'माझ्या बदनामीमागे कोण ते शोधणार' माणिकराव कोकाटे म्हणाले,"मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं नाही हे खरंय. माझ्या बदनामीमागे कोण ते शोधणार आहे. तसेच बदनामी करणाऱ्याचे सीडीआर तपासणार आहे. विनाकारण माझी बदनामी सुरुय, मी चौकशी लावणार आहे, त्यांना कोर्टात खेचनार आहे, त्यांनी कोर्टात व्हिडीओ दाखवावा. चौकशीत सगळं बाहेर येईल. मी दोषी सापडलो तर लगेच राजीनामा देईन. विरोधक काय बोलतात यांच्याकड मी लक्ष देत नाही"
'ढेकळांचे पंचनामे कसे करायचे ?' काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतीचे आतोनात नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वक्तव्य कृषीमंत्री कोकाटे यांनी केले. यावरुन ते ट्रोलही झाले. यावर ढेकळांचे पंचनामे कसे करायचे ? असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.