29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चाची हाक द
Manoj Jarange In Hospital : मराठा आरक्षणासाठी निर्णायक मोर्चाची तयारी; मनोज जरांगेंच्या तब्येतीमुळे आंदोलनावर अनिश्चिततेचं सावट
Manoj Jarange In Hospital: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यात तीव्र आंदोलनाची तयारी सुरू झाली असून, यावेळी आंदोलन अधिक आक्रमक आणि निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 'मुंबईतून मरण घेऊन नाही, तर विजय मिळवूनच परत येणार.' त्यांनी 29 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांना मुंबईत एकत्र येण्याचे आवाहन केले असून, आरक्षणाच्या मागणीसाठी राजधानीकडे मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी मुंबईतील संभाव्य जागेची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे नुकतेच मुंबई दौऱ्यावर गेले होते. मात्र मुंबईहून परतल्यानंतर त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे आता हे आंदोलन होणार की स्थगित होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.