मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातींवर मनोज
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : 'आम्हाला तातडीने प्रमाणपत्र द्या, तुमचे आभार मानू.... अन्यथा'; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
मुंंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातींवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 'कुणी बॅनर लावा किंवा कॅम्पेन करा, तुमचे आभार', अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे. 'आम्हाला तातडीने प्रमाणपत्र तेवढं द्या', असंही मनोज जरांगे म्हणाले.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले की, 'कुणी बॅनर लावा किंवा कॅम्पेन करा, काय करायचं आहे ते करा. जीआरची अंमलबजावणी तातडीने करून हैदराबाद गॅझेट या नोंदणीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे, हे प्रमाणपत्र वाटायला सुरूवात करा. आम्ही पुन्हा एकदा तुमचं कौतुक आणि आभार मानू'.