Maratha Reservation Meeting: मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू, काय तोडगा निघणार?
Maratha Reservation Meeting: मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जरांगे पाटील उपोषणावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु आहे. कुणबी नोंदींच्या पडताळणीसाठी समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात बैठकीत चर्चा होत आहे. यावर काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु आहे. काही मंत्री रॉयलस्टॉन निवासस्थानी दाखल झाले आहेत. तर काही ऑनलाईन राहणार उपस्थित राहिले आहेत. जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत चर्चा सुरु आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी काय उपाय करायचा? यावर चर्चा सुरु आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने निवृत्त सरन्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुणबी नोंदींच्या पडताळणीसाठी एक समिती नेमली आहे. या समितीला मुदतवाढ ही दिली आहे. शुक्रवारी आणि आज मुंबईत मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे अशा चिघळलेल्या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारच्या जेष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत रॅायल स्टोन बंगल्यावर महत्वाची बैठक सुरू आहे. ही बैठक निवृत्त सरन्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.