मनसेकडून येस बँकेच्या कारभाराविरोधात आंदोलन
नागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येस बँकेच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. कर्जदारावर येस बँकेनं कारवाई केल्याने आंदोलन करण्यात येत आहे. जेसीबी कर्जाचे हप्ते थकीत असल्यानं ही कारवाई करण्यात आली. येस बँकेने जेसीबी परस्पर जप्त करुन विकून टाकला. त्यामुळे येस बँकेने केलेल्या कारवाईविरोधात मनसेने आंदोलन छेडले आहे. मनसेने येस बँकेच्या नागपूर माऊंट रोडवरील शाखेत राडा घातला आहे.
मनसेकडून येस बँकेच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. येस बँकेकडून जेसीबी धारकला कर्ज देण्यात आले. मात्र त्यानंतर जेसीबी कर्जाचे हप्ते थकीत असल्यानं कारवाई करण्यात आली. या कारवाई विरोधात येस बँकेच्या माऊंट रोडवरील शाखेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आरटीओ पासिंगसाठी गेले असताना जेसीबी येस बँकेने जप्त करत परस्पर विकून टाकली.
इंद्रजित बळीराम मुळे यांनी जेसीबी कर्जाने घेतली. मात्र जेसीबीचे काही हप्ते थकीत राहिल्याने येस बँकेने मुळे यांच्यावर कारवाई केली. त्यासाठी बँकेत चकरा मारुन न्याय मिळत नसल्याने त्यांनी मनसेकडे न्याय मागितला. या विरोधात मनसेकडून आंदोलन केले जात आहे.