खासदार नारायण राणे बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्य

गुरुवारी बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेणार खासदार नारायण राणे

मुंबई: सध्या, बेस्ट उपक्रम मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बेस्ट उपक्रमाला मुंबई महापालिकेच्या अनुदानावर राहावे लागत आहे. त्यामुळे, बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी, खासदार नारायण राणे बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी बेस्ट भवन कुलाबा येथे भेट घेणार आहेत.

खासदार राणे घेणार महाव्यवस्थापकांची भेट:   बेस्टच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार नारायण राणे मैदानात उतरले आहेत. बुधवारी, खासदार नारायण राणे बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांची भेट घेतील. त्यासोबतच, खासदार राणे बेस्ट भवन कुलाबा येथे बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करतील. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे कर्मचारी कुलाबा येथे उपस्थित राहणार आहेत.

वाहतूक महामंडळ (बेस्ट) यांची आर्थिक स्थिती खालावली:   बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि वाहतूक महामंडळ (बेस्ट) यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. इतकंच नाही, तर बेस्टमध्ये बसमध्ये मोठ्या प्रमाणात खासगीकरण झाल्यामुळे, बेस्ट बस सेवा पूर्णपणे कोलमडली आहे, ज्यामुळे बेस्ट बसला त्यांच्या कामगारांचे पगार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज काढावे लागते आहे. त्यासोबतच, बेस्ट बसेस वेळेवर येत नसल्यामुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळविण्यासाठी न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे आणि हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांवर अजूनही कर्जाचे ओझे आहे. आतापर्यंत अनेक संघटनांनी बसेस खरेदी करण्यासाठी, कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी आणि बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.