जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य

...मजा घेण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांनी जरांगेंना सुनावले

नागपूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आता खरी मजा आहे. हिशोब चुकता करण्याची... पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होताना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते असं विधान करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

...मजा घेण्याचा प्रश्न नाही

देवेंद्र फडणवीस यांना जरांगे यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता त्यांनी यात मजा घेण्याचा प्रश्न नाही. आरक्षण हा विषय जिव्हाळ्याचा आहे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंना सुनावले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

बीडमध्ये कुणाचीही मक्तेदारी चालू देणार नाही

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना बीडमध्ये कुणाचीही मक्तेदारी चालू देणार नाही असे मुख्यमंत्री फडणवीसांना ठणकावले आहे. बीडमध्ये काहीही कारण नसताना तेथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव या प्रकरणी चर्चेत आहे.

हेही वाचा :  Ladaki Bahin : लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरूवात

 

सत्ता माझ्या डोक्यात गेली नाही

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करा. टार्गेट काय करताय असा टोला विरोधकांना लगावला आहे. सत्ता माझ्या डोक्यात गेलीच नाही. काँग्रेसलाही माहिती आहे की ईव्हीएममध्ये छेडछाड होत नाही. काँग्रेस ईव्हीएमवर करत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू सकारात्मक आहे. घुसखोरांना बाहेर काढणारच असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. विनाकारण नागपूरला बदनाम करू नका असे फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं आहे.