कोकाटेंच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवर मंत्री प्र

हल्ली कुणीही रमी खेळतं; माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर मंत्री सरनाईकांची पाठराखण

धाराशिव: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कोकाटेंचा हा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यातच हल्ली कुणीही रमी खेळतं असं म्हणत मंत्री प्रताप सरनाईक यांनी माणिकराव कोकाटे यांची पाठराखण केली आहे. आमिर खान, सलमान खान रमी खेळतात असेही सरनाईक यांनी सांगितले आहे. 

'हल्ली कुणीही रमी खेळतं' कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. माणिकराव कोकाटेंचे रमी खेळतानाचे प्रकरण सध्या तापले आहे. त्यातच महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईकांनी माणिकराव कोकाटेंचे समर्थन केले आहे. हल्ली कुणीही रमी खेळतं. आमिर खान, सलमान खान रमी खेळतात असे सरनाईक यांनी म्हटले आहे. 

कोकाटेंच्या व्हिडिओचे सरनाईकांकडून समर्थन  कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाठराखण केली आहे. अभिनेता आमिर खान, सलमान खान सध्या सगळेच रमी खेळतात असं सरनाईक म्हणाले आहेत. विधिमंडळात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. यावर प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक यांनी माणिकराव कोकाटे यांच समर्थन केलं. 

रोहित पवारांनी पोस्ट केला कोकाटेंचा व्हिडीओ  सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची   “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.