महाराष्ट्रातील ओबीसी आंदोलनाशी संबंधित एक मोठी घट

Laxman Hake: ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांचा कथित ऑडिओ कॉल व्हायरल

Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसी आंदोलनाशी संबंधित एक मोठी घटना समोर आली आहे. या आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांचा कथित ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कॉलमध्ये एका व्यक्तीकडून हाके यांना आंदोलनासाठी आर्थिक मदत देण्याची तयारी असल्याचा संवाद ऐकायला मिळत आहे.

या संवादात लक्ष्मण हाके यांनी संबंधित व्यक्तीसोबत पैशांबाबत चर्चा केली, असे ऑडिओमध्ये ऐकू येते. तरुणाने कॅश, गुगल पे किंवा फोन पे द्वारे पैसे देण्याचा पर्याय विचारल्याचे ऐकू येते. त्यावर हाके यांनी थेट नंबर देण्याऐवजी ड्रायव्हरच्या UPI नंबरचा उल्लेख केल्याचे सांगितले जाते. संभाषणादरम्यान ‘रितेश’ नावाच्या व्यक्तीचा नंबरही सांगितला गेला, असा दावा आहे.

पुढे या संवादात तरुणाने हाके यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. समाजाच्या नावाखाली पैसे घेणे, सुपाऱ्या घेणे आणि राजकीय नेत्यांविरोधात भडकावणे अशा गंभीर आरोपांचा उल्लेख या क्लिपमध्ये आल्याचे म्हटले जात आहे. यामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.

या ऑडिओ क्लिप मधील मूळ सांभाषण

लक्ष्मण हाके - कोण बोलतंय 

तरुण: तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला किंवा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढा आपल्यासाठी पळत आहे  

लक्ष्मण हाके - काय देताय मला.. मानधन...कुठलं गाव

तरुण - अकलूज..गाव, तुम्हाला कधी समोर कुठे भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळत आहे... गाडीसाठी तेल लागतं... तर कॅश स्वरूपात द्यायचं का गुगल पे फोन पे... 

लक्ष्मण हाके - धन्यवाद दादा .... भेटल्यावर द्या... 

तरुण - तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर द्या .. त्याला यूपीआय पण आपल्याला करता येईल...  लक्ष्मण हाके - नाही राहू द्या... अकलूज परिसरात आल्यावर भेटू .. 

तरुण : नाही... भेटण्यापेक्षा युपी आयवर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते. डायरेक्ट.तुम्ही कधी यायचा इकडे. आम्ही पण बाहेर पुण्याला असतो.  लक्ष्मण हाके - पुण्यातच आहे मी राहायला.कुठे राहता तुम्ही. 

तरुण - कोथरूड  

हाके : उद्या आहे पुण्यात सकाळी.

तरुण - ऑफिसला जाताना येतो.तुमचा युपीआय नंबर असेल तर द्या ना. हाके - पाठवतो एक मिनिट. रितेश गुगल पे फोन पे नंबर दे.

तरुण: सांगता का मला  

हाके - हाकेंचे सहकारी रितेश बाहेरवाड यांनी फोन पे नंबर कॉल दरम्यान सांगितला. 

तरुण - सरांचा फोन पे नंबर नाही का.हाके - ऐका ना माझा अकाउंट नाही.रितेश माझा ड्रायव्हर आहे.अकाउंटला मी पैसे घेत नाही. 

तरुण - तुम्ही समाजासाठी एवढं काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हालाच सहकार्य करतेत ... तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडून पैसे घेता... सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याच बोलता... लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला... जनाची नाही तर मनाची... समाजाच्या विरुद्ध भडकवताय. . जरांगेंला बोलता.... सुपार्‍या घेता... जनाची नाही तर मनाची... शहाजी बापूच्या विरोधात उभारला 200 मते पडली नाहीत.... तुझी औकात नाही साल्या.... तू समाजाच्या विरोधात काम करतो... 

यानंतर फोन कट होतो.

तथापि, ही ऑडिओ क्लिप खरी की खोटी याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. तरीदेखील या घटनेमुळे ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय वादळाची शक्यता व्यक्त केली जात आहे.