हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानं मविआत आनंद; विधानभवन परिसरात टाळ वाजवून व्यक्त केला आंनद
मुंबई: आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला असून गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अधिवेशनाला स्थगिती देण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 'मी मराठी' लिहिलेली पाटी घेऊन विरोधक विधानभवन परिसरात आले. सरकारला हिंदी सक्ती मागे घ्यावी लागली आणि मराठी माणसाची ताकद दिसली असल्याचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेनेने घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसेनेकडून करण्यात आली.
हेही वाचा: बीड अत्याचार प्रकरणावरुन दमानियांचे संदीप क्षीरसागरांवर आरोप
विधानभवनाच्या प्रवेशपासवरून राजचिन्ह गायब करण्यात आले. प्रत्येक अधिवेशनात विधानभवनामध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पासवर राजचिन्ह पाहायला मिळतं. मात्र यावेळी हे चिन्ह काढण्यात आले. या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, आता पास वरून चिन्ह काढण्यात आलंय. उद्या पत्रकारांना विधानभवनातून बाहेर काढतील अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
दरम्यान सरकारने घाबरुन हिंदी सक्ती मागे घेतली असा घणाघात रोहित पवार यांनी सरकारवर केला आहे. ठाकरे बंधूंच्या मोर्चापूर्वी जीआर रद्द केला अशीही प्रतिक्रिया रोहित पवार यांनी माध्यमांना दिली आहे.