पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील दुर्

'जो भारताचा नागरिक नाही...'; पंतप्रधान मोदींचा घुसखोरांना इशारा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका सभेला संबोधित केले. यादरम्यान, मोदींनी घुसखोरांना कडक इशारा देत म्हणाले की, 'घुसखोरांविरोधात कठोर कारवाई केली जाईल'. पुढे मोदी म्हणाले की, 'तृणमूल काँग्रेसने घुसखोरांच्या बाजूने मोहीम सुरू केली आहे आणि देशभरात तृणमूल काँग्रेसचे षड्यंत्र उघड झाले आहे'. यासह मोदींनी घुसखोरांना इशारा दिला की, 'तृणमूल काँग्रेस सरकार उघडपणे घुसखोरांच्या समर्थनार्थ बाहेर पडले आहे. मात्र, जे या देशाचे नागरिक नाहीत, अशा कोणत्याही व्यक्तीवर कारवाई नक्कीच केली जाईल'. 

हेही वाचा: 'बाप आजोबा आले तरी मुंबई...'; फडणवीसांचं रोकठोक वक्तव्य

पंतप्रधान मोदी दुर्गापूर दौऱ्यावर

शुक्रवारी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगाल येथील दुर्गापूर दौऱ्यावर होते. यादरम्यान, त्यांनी 5 हजार 400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यात, तेल, वायू, वीज, रेल्वे आणि रस्ते या संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या ममता सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले की, 'तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीमुळे पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक येत नाही आणि राज्याचा विकास होत नाही'. 

हेही वाचा: Today's Horoscope: 'या' राशीची आर्थिक स्थिती आज मित्रांच्या कृपेने उजळणार

मोदींनी दिला घुसखोरांना इशारा

'आज तृणमूल काँग्रेसने घुसखोरांच्या बाजूने एक नवीन मोहीम सुरू केल्याचा कट देशासमोर उघड झाला आहे. ते देशातील संवैधानिक संस्थांनाही आव्हान देत आहेत. तृणमूल काँग्रेस आता त्यांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. पण दुर्गापूरच्या रॅलीतून मी हे उघडपणे सांगू इच्छितो की जो कोणी भारताचा नागरिक नाही, ज्याने घुसखोरी केली आहे, त्याला भारतीय संविधानानुसार योग्य कारवाईला सामोरे जावे लागेल', अशा कडक शब्दात मोदींनी घुसखोरांना इशारा दिला.