Anjali Damania On Amol Mitkari : 'हा काय फालतूपणा...' अमोल मिटकरी यांच्या पत्रावर अंजली दमानिया यांचा संताप
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्याने काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या व्हायरल कॉलचे पडसाद उमटले आहेत. याबद्दलच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित केली. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतापल्या असून त्या IPS ऑफिसरना छळण्याचा प्रयत्न केला तर कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे.
काय केली पोस्ट ?
अंजली दमानिया यांनी एक्सवर अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला लिहिलेलं पत्र शेअर केलं. तसेच लिहिलं की, "हा काय फालतूपणा आहे ? अमोल मिटकरींनी त्यांच्या Boss च्या सांगण्यावरून हे पत्र लिहिले, की स्वतःचे डोकं वापरले? अंजना कृष्णाची चौकशी ? का ? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून? चौकशी त्या अजित पवारची झाली पाहिजे. ज्या कंपन्यांनमधे अजित पवारच्या कब्ज्यात आहेत त्याच्या चौकश्या झाल्या पाहिजेत, ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील, त्यांच्या चौकश्या झाल्या पाहिजेत. त्या IPS ऑफिसर ना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन. IPS ऑफिसर्स च्या बूट पुसण्याची लायकी नसते ह्या राजकारण्यांची. दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे".
हेही वाचा - Department of War: अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून होणार ‘युद्ध विभाग’; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
पुढे त्यांनी लिहिले की, "आयपीएस बनतांना देशासाठी काहीतरी करू ही भावना असते. अंजना कृष्णा ला वाटलं मी हे सगळं अवैध काम, गुंडगिरी बंद करेन. तिला कुठे माहिती की ह्या गुंडांना वर बसलेला एक बाप असतो, आणि जर कोणी त्यांचे काम थांबवले तर अशा प्रत्येकाला टारगेट केले जाते. हेच कारण आहे की आपल्या तहसीलदार, कलेक्टर, एसपी, कुणकुणामध्ये हिंमत राहत नाही ह्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची".
नेमका वाद काय आहे? सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाविरुद्ध कारवाई करताना अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडीओ कॉलवर वाद झाला. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते बाबा जगताप यांनी अजित पवारांना फोन लावून अंजना यांना दिला. पवार संतापले आणि त्यांनी 'इतनी डेरिंग है तुम्हारी?' असे म्हणत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते.