शिवसेनेतर्फे भारतीय जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये
'मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन करतो' - एकनाथ शिंदे
शुभम उमाळे. प्रतिनिधी. जम्मू-काश्मिर: शिवसेनेतर्फे भारतीय जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रक्तदान केले. या दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. 'मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन नक्कीच करतो. कुस्तीत जसे डावपेच असतात, तसे माझ्याकडे सुद्धा डावपेच आहेत', असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केले.