'सरकारची भूमिका सध्या तरी राज ठाकरेंना मान्य नाही'
मुंबई: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज यांच्याशी भुसे यांनी चर्चा केली. यावेळी सरकारची भूमिका सध्या तरी राज ठाकरेंना मान्य नाही असे दादा भुसे यांनी सांगितले.
राज्य सरकारने मुलांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती केली आहे. याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राज यांच्या भेटीला गेले होते. मात्र राज ठाकरे भूमिकेवर ठाम आहेत. ठाकरे आणि भुसे यांच्या भेटीनंतर माध्यमांनी भुसे यांनी प्रश्न विचारले. त्यावर सरकारची भूमिका सध्या तरी राज ठाकरेंना मान्य नाही असे भुसे यांनी सांगितले. तिसऱ्या भाषेसंदर्भात राज ठाकरे यांनी काही सूचना दिल्या, त्याचा विचार करु असे शिक्षणमंत्री भुसे यांनी सांगितले. त्रिभाषा सूत्रांसंदर्भात राज ठाकरेंशी संवाद झाल्याचे त्यांनी म्हटले.
काय म्हणाले राज ठाकरे? नुकतच राज ठाकरे आणि दादा भुसे यांची भेट झाली. या भेटीत दादा भुसे यांनी त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा केली. यावर सरकारची भूमिका आम्हाला मान्य नसल्याचे मनसे नेते राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढणार आहे असेही त्यांनी म्हटले. हा मोर्चा केवळ मराठी माणसांसाठी असणार आहे. मोर्चात कोण येणार आणि कोण नाही? हे बघायचंय. ठाकरे गटाच्या नेत्यांसोबतही चर्चा करणार असल्याचे राज यांनी सांगितले. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र, मराठी भाषा महत्त्वाची आहे. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं भुसेंकडे नव्हती असेही राज म्हटले.