पिंपरी-चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात महाराष्

कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी उडवली खिल्ली

पुणे  : पिंपरी-चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १९ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी महाकुंभातील श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर भाष्य केले आहे. 

'अस्वच्छ गंगेचं पाणी कोण पिणार?' कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. देशातील एकही नदी स्वच्छ नाही. अंधश्रद्धेतून बाहेर या, डोकी हलवा असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.गंगा स्वच्छ होणार राजीव गांधींच्या काळापासून ऐकतोय. पण अद्यापही ती स्वच्छ झाली नाही. अस्वच्छ गंगेचं पाणी कोण पिणार असंही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : राज्यातील 30 टक्के कुटुंबांचे स्वस्त धान्य बंद होणार

'राजकारण्यांनी महाराष्ट्राचा चिखल केला' राजकारण्यांनी महाराष्ट्राचा चिखल केला आहे. केवळ मतांसाठी लोकांची माथी भडकवणं सुरू आहे. गुढीपाडवा मेळाव्यात दांडपट्टाच काढणार असल्याचे राज यांनी सांगितले. 14 वर्षात श्रीराम अयोध्येतून लंकेत जाऊन आले. तसेच मुंबईत वांद्रे सी लिंक उभा करायला 14 वर्ष जातात. कोणताही कार्यकर्ता असू द्या काम काम केलं नाही तर पदावरुन हटवणार असल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी यावेळी घेतला. प्रत्येक कार्यकर्त्याचं काम दर 15 दिवसांनी तपासलं जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

'राजकारणी फेरीवाले'  फेरीवाले कष्ट करतात. आज इकडे तर उद्या तिकडे असतात असतात. राजकारणीही फेरीवाले आहेत. आज इकडे असतात तर उद्या तिकडे असतात अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. आपल्याला राजकीय फेरीवाले बनायचे नाही. आपल्याला बांधायचा असेल तर खणखणीत  दुकान बांधू. फेरीवाले बांधायचे नाहीत. असले राजकीय फेरीवाले उभे करायचे नाहीत अशी कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितले.