महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीत नवीन घडामोडी, आठ

'राज ठाकरेंची महायुतीला आवश्यकता नाही' कोण म्हणाले ?

रामदास आठवले यांचे परखड मत – ‘महायुतीत राज ठाकरे नसावेत’

महायुतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सहभागी करून घ्यावे की नाही, याबाबत आता महायुतीतीलच मोठ्या नेत्यांनी मतप्रदर्शन सुरू केले आहे. यावर आता आरपीआयचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी परखड भूमिका मांडली आहे. राज ठाकरेंना महायुतीत सामील करू नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

महायुतीला निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची ताकद वाढवण्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती, तर मंत्री उदय सामंत यांनीदेखील शनिवारी त्यांची भेट घेतली. यामुळे मनसे महायुतीत सहभागी होणार का, यावर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र, यावर रामदास आठवले यांनी थेट भूमिका घेत, “आरपीआय असताना राज ठाकरेंची गरज नाही,” असे मत व्यक्त केले आहे.

रामदास आठवले काय म्हणाले? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकवेळा युती आणि आघाड्या बनतात आणि तुटतात. पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणुका एकत्र लढवल्या होत्या, आता शिवसेनेसह महाविकास आघाडीची संरचना आहे. मात्र, ते तीनही पक्ष एकत्र राहतील का, याबाबत शंका आहे. महायुतीने मात्र एकत्र राहून निवडणुका लढवल्या पाहिजेत, असे रामदास आठवले म्हणाले.

“राज ठाकरेंची महायुतीत आवश्यकता नाही” राज ठाकरे आमचे चांगले मित्र असले तरी त्यांना महायुतीत घेतले जाऊ नये, असे आमचे स्पष्ट मत आहे. आरपीआय महायुतीचा घटक पक्ष असताना, राज ठाकरेंची गरज नाही. लोकसभेत त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला वारंवार जात आहेत, मात्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना भेटायला यायला हवे, असेही आठवले यांनी नमूद केले.

महापालिका निवडणुकीत १० ते १२ जागांची मागणी रामदास आठवले यांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी आरपीआयला १० ते १२ जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच, नवनिर्मित महामंडळांमध्ये आरपीआयला तीन अध्यक्षपदे मिळावी, अशीही त्यांची मागणी आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जागा मिळाली नाही, त्यामुळे आता तरी आरपीआयला संधी मिळायला हवी, असे त्यांनी सांगितले.

रामाचे नाव घेणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री माणसाच्या हृदयातील राम पाहू शकत नाहीत – वासुदेव मुलाटे