Sanjay Raut On Devendra Fadanvis: राऊतांकडून फडणवीसांची स्तुती, राजकीय चर्चांणा उधाण
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात आंदोलनाची स्थिती दिसत होती. रस्त्यावर ठिय्या, मोर्चे, उपोषणे, निर्देशन आणि लोकांची गर्दी पाहायला मिळत होती. मराठा समाजाने केलेल्या आंदोलनामुळे राज्यात गदारोळ माजला होता. यामुळे सरकारमध्ये बैठकांचे सत्र देखील बघायला मिळत होतं. मात्र आंदोलक त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. याच तणावपूर्ण वातावरणात कधी वादंग तर कधी तोडगा निघेल अशी चिन्हे पाहायला मिळत होती. अशातच सरकार आणि मराठा आंदोलक यांच्यातील चर्चेला सकारात्मक वळण मिळाले. दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींना संयम ठेवून संवाद साधल्याने चर्चेतून मार्ग निघाला. अखेर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करुन त्यांना आरक्षण दिले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राऊत म्हणाले, "सरकार आणि आंदोलकांमध्ये समेट झाला आहे. मराठा समाज समाधानी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा आहे. ओबीसी समाज्यांच्याही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत."
राऊतांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. त्यांच्या विधानातून अनपेक्षित सूर दिसून येत आहे.राऊत हे नेहमी सत्ताधारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्रमक भूमिका मांडत असतात. मात्र यावेळी त्यांनी फडणवीसांची स्तुती केली आहे. यामुळेच राऊतांच्या वक्तव्यावर राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.